पोलीस वाहनानी तिघांना उडविले, तिन जागीच ठार ❗️

दांडेगाव बसस्थानकाजवळ भीषण अपघात

गोंदिया : गोंदिया–तिरोडा महामार्गावरील दांडेगाव बसस्थानकाजवळ बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले असून, घटनेमुळे दांडेगाव, खडबंदा आणि सेजगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडबंदा येथील कामडे आणि बावनकर हे दोन युवक गावातील धान कापणीच्या हार्वेस्टर मशीनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कामानिमित्त सेजगाव येथे आले होते. त्यांच्यासोबत कार्तिक बिसेन यालाही घेऊन तिघे दुचाकीने परत जात असताना दांडेगाव बसस्थानकाजवळ हा भीषण अपघात घडला.

दरम्यान, रात्री सुमारे ८.३० वाजता त्यांच्या दुचाकीला पोलिसांच्या वाहनाची जोरदार धडक बसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी

या दुर्घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना

अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. आज, गुरुवारी सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातासंदर्भात पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिस वाहनाची भूमिका आणि अपघाताची नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.


या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें