ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

देवरी : तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला प्राधान्य देणाऱ्या ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शिक्षक नितेश लाडे, वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे, नलू टेंभरे, भोजराज तुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संविधान दिनानिमित्त मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांची माहिती करून दिली. संविधानाचा आदर करून जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनीही संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याची भावना रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें