ताबडतोब धान खरेदी करुन मागील बोनस पण द्या- भाजप

( आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत सर्वच धान खरेदी केंद्र सध्या बंदच )

प्रहार टाईम्स
देवरी 26-
मानव जातीतील सर्वांचा अन्नदाता म्हणजेच, भूमिपुत्र शेतकरी. या अन्नदाता भूमिपुत्र शेतकर्‍यांना विनाकारण कोरोनाच्या संकटात मानसिक त्रास देण्यापेक्षा, ताबडतोब रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरु करुन मागील धानाचे बोनस पण ताबडतोब देण्याची मागणी देवरी तालुका भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.


25 मे मंगळवारला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागणी आहे की, गोंदिया जिल्ह्यात रब्बी धानाची अंदाजे 65 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली असून अंदाजे 28.50 लक्ष क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे. माहे एप्रिल ते मे महिन्यापर्यंत धानाची कापनी झालेली असून शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे पावसाचे वातावरण बघून आपले धान्य आधारभूत धान खरेदी केंद्र अजूनही सुरु न झाल्यामुळे खुल्या बाजारात कमी दरात विकावे लागत आहे. त्यामुळे अन्नदाता शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे; हे कोरोनाच्या अतिसंकटात कितपत योग्य आहे ?
2020 – 21 वर्षातील खरीप हंगामातील धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना 50% बोनस देण्याचे घोषित करण्यात आले होते. ते सुद्धा आठ महिन्याचे कालावधी लोटले तरीपण शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही बोनसची रक्कम जमा झालेली नाही. तसेच शासनाच्या माध्यमातून धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत 1100 विहीरी मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वखर्चाने विहिरीचे बांधकाम काहींनी स्वतः जवळील तर, काहींनी सावकारी कर्ज घेऊन पूर्ण केले. ती निधी सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा विविध ज्वलंत विषयावर प्रकाश टाकून भाजप महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीचे सचिव संजय पुराम, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहीकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया आणि माजी नगरसेवक संजय उईके यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून स्थानिक तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.


निवेदनाकडे दूर्लक्ष केल्यास, 27 मे पासून जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि स्थानिक तहसील कार्यालयासमोर सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share