शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी 9 पथक सज्ज

कृषी विभाग सज्जः खत, बियाणेमध्ये दोष आढळल्यास होणार कारवाई

गोंदिया : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची बियाणे, खते आणि कीटकनाशकांत कृषी केंद्रांच्या माध्यमातून फसवणूक होवू नये, यासाठी ९ पथक तयार करण्यात आले आहेत. गतवर्षी घेतलेलेल्या खत, बियाणे आणि कीटकनाथकांचे नमुने सदोष आढळून आले होते. त्यामुळे आता विभागाकडून कसोशीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तहसीलमध्ये एक आणि जिल्हा पातळीवर एक असे एकूण ९ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी गेल्या हंगामात अनेक केंद्रांची तपासणी केली होती आणि अनियमितता आढळल्यानंतर अनेक केंद्रांचे परवाने कायमचे रद्द केले होते.

काहींवर न्यायालयीन कारवाईही करण्यात आली. खरीप हंगामात, संपूर्ण जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची कृषी विभागाकडून तपासणी केली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. यासाठी कृषी विभागाकडून गट तयार केले जातात. खरीप हंगाम जवळ येत आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांसोबतच कृषी विभागानेही तयारी सुरू झाली आहे. २०२४-२५ च्या खरीप हंगामात, चाचणी पथकांनी बियाण्यांचे ६६६ नमुने, खतांचे ४६८ नमुने आणि कीटकनाशकांचे १४५ नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते. त्यापैकी २१ बियाणे, ४६ खते आणि ६ कीटकनाशके चाचणीनंतर निकृष्ट दर्जाची आढळली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें