अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे नुकसान, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

देवरी : देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके काढणीस तयार असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर विर्जन घातले आहे. एका बाजूला तुडतुडा, करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव, दुसऱ्या बाजूला मजुरांचा अभाव आणि त्यातच पावसाच्या अनिश्चिततेने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

सध्या अनेक शेतकरी मिळेल त्या साधन सामुग्रीच्या मदतीने, यंत्रांच्या साहाय्याने मळणी करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत., त्यामुळे हातात आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून वेळ वाचवण्याची धडपड सुरू आहे.देवरी परिसरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. परिणामी, यंत्रांच्या साहाय्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. परिसरातील शेतकऱ्यांसाठी सध्याची स्थिती अत्यंत गंभीर असून, रोगट पिके, मजूरटंचाई, यंत्रांची मर्यादा, वाढता खर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. मजुरीचे दरही दिवसेंदिवस वाढत असल्याने, ज्या शेतकऱ्यांना मोजके मजूर मिळतात त्यांनाही खर्चाचा मोठा बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आता अधिकच चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.

पिकांवर तुडतुडा, करपा रोगांचा हल्ला

अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके कापणीसाठी तयार झाली असली तरी त्यावर तुडतुडा, करपा यांसारख्या रोगांनी हल्ला चढवला आहे. या रोगांवर उपाय म्हणून शेतकरी हजारो रुपयांची औषधे फवारत आहेत, तरीही समाधानकारक परिणाम दिसून येत नाही. सध्या काही शेतकरी पीक कापून मळणी करत असताना, दुसरीकडे काहींनी अजून पीक उभे ठेवले आहे. त्यांना पीक पूर्णपणे तयार होण्यासाठी पाच ते १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत जर पावसाने अचानक हजेरी लावली, तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कष्ट वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें