ब्लॉसम स्कूलच्या जिया राऊत ची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

◼️जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे पार पडली स्पर्धा

गोंदिया ◼️तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ब्लॉसम स्कूलचे श्रुती राठोड, जिया राऊत, किरण रत्नाकर, नितीन भोयर, यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये जिया राऊत हिने जिल्हातून अव्वल स्थान मिळवला असून तिची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

सदर विद्यार्थी क्रीडा शिक्षक राहुल मोहरले आणि अजित टेटे यांच्या नेतृत्वात स्पर्धेत सहभागी झालेले होते. यावेळी सर्व सहभागी आणि विजयी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share