जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ब्लॉसम चा कुणाल चुटे अव्वल

◼️जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे पार पडली स्पर्द्या

देवरी 25: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलचा विद्यार्थी कुणाल चुटे यांनी नुकतीच झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत बाजी मारली असून त्याची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ब्लॉसम स्कूलचे कुणाल चुटे यांनी अव्वल स्थान मिळवला असून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सदर विद्यार्थी क्रीडा शिक्षक राहुल मोहरले आणि अजित टेटे यांच्या नेतृत्वात स्पर्धेत सहभागी झालेले होते. यावेळी सर्व सहभागी आणि विजयी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी अभिनंदन केले.

कुणाल याने आपल्या यशाचे श्रेय योग शिक्षक रोहित ब्राह्मणकर , आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share