सावधान 🚨महिला सरपंचांच्या पतींना ग्रामपंचायतीत आता ‘नो एंट्री’

◼️कामात हस्तक्षेप केल्यास कारवाई करण्याचा निर्णय

गोंदिया : ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच किंवा त्यांचे पती तसेच इतर नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे.

यामुळे महिला सरपंचाच्या स्वातंत्र्यातही गदा येते. या प्रकारांमुळे सरपंच, सदस्यांच्या नातेवाइकांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

जिल्ह्यात ५४४ ग्रामपंचायती असून त्यात महिलाराज सरपंच असलेल्या १५० वर ग्रामपंचायती आहेत. यातील बहुतांश ठिकाणी महिला सरपंच यांचे पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करतात. त्याचा ग्रामसेवकासह ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

शासनाने आरक्षण दिल्याने महिलांना सरपंच व इतर पदाची संधी मिळाली. त्यात काही ठिकाणी पतीराज किवा नातेवाईक हस्तक्षेप करतात. तो टाळण्यासाठी शासनाने हस्तक्षेप थांबविण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे महिलांना स्वतः काम करता येईल. पतीराज किवा नातेवाइकांनी हस्तक्षेप केल्यास आम्हीही यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share