स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषदेने केला तंबाखु मुक्तीचा संकल्प

गोंदिया-तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, ह्रुदयरोग,मधुमेह, मुखकर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2004 च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो हे प्रमाण कमी करणे आवश्यक असल्यामुळे ” दि.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त” प्रत्येक शासकिय , निमशासकिय कार्यालये, शाळा, आरोग्य संस्था या ठिकाणी ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. त्या अनुशंगाने  दि. 15 ऑगस्ट 76 व्या स्वातंत्र्य दिनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल पाटील यांनी समस्त अधिकारी व कर्मचारीवर्गाला तंबाखू मुक्तीची शपथ दिली. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष  पंकज रहांगडाले ,समाज कल्याण विभागाचे सभापती श्रीमती पुजा अखिलेश सेठ,जिल्हा ग्रामीण विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर ,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर , मुख्य लेखा व वित्त अधिकारी .जनार्दन खोटरे, बाल विकास तथा समाजकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर ,पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, कृषी विकास विभागाचे कृषी विकास अधिकारी महेंद्रकुमार मडामे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले,शिक्षणाधिकारी(माध्यमिक)श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत ,महात्मा ग्रामिण रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.हरिणखेडे ,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरजंन अग्रवाल, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, विस्तार अधिकारी सांख्यिकी श्रीमती वैशाली खोब्रागडे यांचे समवेत जिल्हा परीषदेतील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.
शपथ पत्रात तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का,ई-सिगारेट यांच्या दुष्परिणामांची जाणीव,जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प, माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चा संकल्प , माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त तसेच इ सिगारेट मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.

द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार
तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थ जसे जर्दा, खर्रा,बिडी, सिगारेट व हुक्का इत्यादी सेवन करण्याचे प्रमाण लोकांमध्ये वाढत चालेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, ह्रुदयरोग,पक्षघात, अर्धांगवायू यासारखे आजार बळावु लागलेले आहे. डोक्यांच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तंबाखूचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व संस्था, शाळा, शासकीय कार्यालय,ग्रामपंचायत यांनी तंबाखूमुक्त गाव, नगर व परिसर यांनी तंबाखु मुक्तीची संकल्प करुन चळवळ निर्माण करण्याची गरजेचे झाले आहे.
                                – मा. पंकज रहांगडाले , अध्यक्ष , जिल्हा परिषद गोंदिया

धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू ही जगभर असलेली गंभीर समस्या आहे.
तंबाखूमध्ये अनेक रसायने आहेत. यामध्ये निकोटीन व अन्य अनेक हानिकारक व कर्करोगास कारणीभूत रसायने यांचा समावेश असतो. तंबाखूच्या पानातील निकोटीन मुळे मळमळणे, चक्कर येणे, डोके जड होणे, उलट्या होणे, पोट दुखणे अश्या तक्रारी येतात.आपल्या शरीरातील जवळ जवळ प्रत्येक अवयवावर तंबाखूचा दुष्परिणाम होऊ शकतो. भारतात तोंडाचा कर्करोग, जो तंबाखू खाण्यामुळे होतो, ह्याचे प्रमाण चिंताजनक आहे.असंसर्गजन्य आजार यामध्ये कर्करोग, हृदयरोग, श्वसन मार्गाचे आजार आणि डायबीटीस यांचा समावेश आहे. या आजारांसाठी तंबाखू सेवन एक धोक्याचा घटक आहे. असंसर्गजन्य आजार यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत आहे.
-मा. अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया

Print Friendly, PDF & Email
Share