आमगाव विधानसभेत पुरामांचा जलवा, अपक्षांचे अति आत्मविश्वास !

🔺जनता जनार्धनांना सामाजिक क्रांतीचे धडे

डॉ. सुजित टेटे : आमगाव विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा जोर चांगलाच वाढला असून, मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. येत्या निवडणुकीत मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीच्या पुराम विरुद्ध पुराम या दोन उमेदवारांमध्ये रंगणार असून बंडखोराचे गणित बिघल्याची खमंग चर्चा सुरु आहे.

भाजपच्या इच्छुकांची नाराजी, पदाधिकारी कार्यकर्ते ठाम

महायुतीने भाजपच्या संजय पुराम यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. असे असले तरी काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट दिसून आली यातच शंकरलाल मडावी यांनी भाजपच्या अंतर्गत नेतृत्वावर आरोप करत बंड पुकारले आहे. मडावींच्या मते, भाजपच्या नेत्यांनी आपले निर्णय मतदारांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. असे असले तरी संजय पुराम यांच्या तगड्या अनुभवाचे आणि मोर्चे बांधणीचे काम ग्राउंड ज़ीरो वर सुरू असून नवख्या उमेदवारांना शर्यतीत मोठी कसरत बघावयास मिळत आहे.

महाविकास आघाडीतही अंतर्गत विद्रोह ; नवख्या पुरामांना अनुभवाचा अभाव

महाविकास आघाडीकडून नवख्या राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांची तिकीट कापल्याने त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार नाराजी असून त्यांची नाराजीही आघाडीला त्रासदायक ठरु शकते. राजकुमार पुराम यांना राजकीय अनुभवाचा अभाव असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आणि उत्सुकता नाही आहे. स्थानिक मतदारांना तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राजकुमार पुराम परिचित नाहीत त्यांचा स्थानिक लोकांशी देखील फारसा परिचय नाही ज्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते सक्रिय आहेत.

अपक्ष उमेदवारांचे आमदार बनण्याचे स्वप्न, आपणच भावी आमदार असल्याचे अति आत्मविश्वास

महायुती आणि महाविकास आघाडीत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष, बंडखोर, आणि इतर पक्षांचे उमेदवारही या निवडणुकीत उतरले असून निवडणुकीत त्यांची कोणतीही बाजू निश्चित नसल्याचे जाणवत आहे. मतदारसंघात अति आत्मविश्वास दाखविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे स्वप्न मतदार पूर्ण करणार का ? आश्चर्याचे विषय ठरले आहे.

कोण ठरणार गेम चेंजर ?

आमगाव देवरी विधानसभा निवडणुकीत पुराम विरुद्ध पुराम अशी थेट लढत आहे. यावेळेस दोन्ही पुरामांकरिता विपरीत परिस्थिती असली तरी, हलबा समाजाच्या नाराजीमुळे बदललेली समीकरणे आणि मतदारसंघातील अंतर्गत असंतोष निवडणुकीचे निकाल कसे बदलतील आणि शेवटी आमगाव विधानसभा क्षेत्रात कोणत्या पुरामांची लाट येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आमगाव देवरी विधानसभा भाजपचा बालेकिल्ला

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर गोंदिया जिल्ह्यात एकूण ४ विधानसभा मतदार संघ अस्तित्वात आले. यामधे मागील इतिहास बघता आमगाव हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. सन १९६२ पासून २०१९ पर्यंत एकूण १३ सार्वत्रिक विधानसभा निवडणुका झाल्या यामधे तब्बल ८ वेळा भाजपचे उमेदवारांनी विजयाचा झेंडा रोवला आहे. तर फक्त ४ निवडणुकीत कांग्रेसच्या उमेदवारांनी विजय प्राप्त करता आले. आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी महत्वाची ठरणार आहे. मागील ५ वर्ष हा विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या ताब्यात असल्याने भाजपला या क्षेत्रात चांगलीच दमछाक करावी लागणार आहे.

Share