विदर्भ स्तरीय गुणिजन गौरव पुरस्कारासाठी आवेदन
पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! – डॉ घनश्याम निखाडे
गुणवंतांनो, प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा !!! करीता श्याम महाजन बहुउद्देशिय विकास संस्था, शेडेपार” तह. देवरी जिल्हा गोंदिया, (रजि. ट्रस्ट) तर्फे सहभाग नोंदणी प्रवेशिका 15 डिसेंबर २०२४ पर्यंत मागविण्यात येत आहेत . पुरस्कार प्रस्तावासाठी कार्यपरिचय फाईल 9637306377 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी किंवा पुरस्कार नामांकन ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्यासाठी खालील https://smbvs.in/ लिंकवर क्लिक करावे किव्हा या ईमेल [email protected] वर पाठवावे व ऑफलाईन स्व-नामांकन साई ऑनलाइन सेंटर शेडेपार ता देवरी जिल्हा गोंदिया 441901 येथे पाठवावे. संस्था तर्फे देण्यात येणारे पुरस्कार १. गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२५, २. आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२५, ३. कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०२५, ४. आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२५, ५. प्रगतिशील शेतकरी शेतीरत्न पुरस्कार २०२५,६. आदर्श नेता राजरत्न गौरव पुरस्कार २०२५, ७. गुणवंत विद्यार्थी पुरस्कार २०२५, ८. जेष्ठ नागरिक, ९. पर्यावरण रत्न पुरस्कार,१०. युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप:- सिल्वर मेडल, मोमेंटो, प्रमाणपत्र,शाल श्रीफळ, गुलदस्ता असा असणार आहे. पात्रता निकष :उमेदवार विदर्भातील असावा. आपल्या क्षेत्रात अद्वितीय योगदानाचे प्रमाणपत्र / पेपर कटिंग असणे बंधनकारक आहे, निवड झालेल्या उमेदवारांचे 5 जानेवारी 2025 रोजी स्व. दलीरामजी डोमाजी निखाडे (महाजन) यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार अतिशय अविस्मरणीय सुरेख, देखणा, दिमाखदार होणार असून समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. हा समारंभ समाज भवन शेडेपार येथे आयोजित केला जाईल. आयोजक संस्थापक डॉ घनश्याम एस निखाडे, संदीप गायधने, देविदासजी लांजेवार, मिथुन चव्हाण, हितेश हटवार, प्रा. विजया निखाडे व गुणवंत पुरस्कार वितरण समिती यांनी केलेला आहे.