कविता : साथ

✍️सुदर्शन लांडेकर देवरी
9420191985

कोण साथ देणार कोण सोडून जाणार
हा कलयुग आहे जनाब इथे स्वार्थी माणूस जगणार
इथे कोण कोणासाठी थांबणार इथे कोण कोणासाठी उरणार
पोटचा पोरगा सुद्धा आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडणार
कोण साथ देणार…………..

सच्च्या प्रेमाला धोका देणारा मिळणार
सच्च्या माणसाची किमंत नाही होणार
खऱ्या प्रेमाला तुच्छ पणे पाहणार
धोकेबाज माणसाला लोक जवळ करणार
कोण साथ देणार…………

खोट्याचा जमाना असणार
लोक बेवफाई करणार, पैशाला किमंत देणार
नवरा बायकोला धोका देणार बायको नवऱ्याला धोका देणार
सत्य कमजोर पडणार, असत्य वाढतच जाणार
कोण साथ देणार…….

गरिबाला कोण साथ देणार
श्रीमंत व्यक्ती च्या मागे हजारो लोक धावणार
प्रेम फक्त नावापुरते असणार, प्रेमाचा लोक तमाशा मांडणार
पैसा समोर लोक आपली इज्जत सुद्धा विकणार
कोण साथ देणार…….

मैत्री सुद्धा स्वार्थी असणार
कामापुरते लोक आपल्या मागे मागे धावणार
चांगल्या गोष्टी फक्त पुस्तकापुरते मर्यादित असणार
देवाच्या नावाने लोक चोऱ्या सुद्धा करणार
कोण साथ देणार…….

Share