सावधान ! गोंदिया जिल्हात थायलंड वाघूर मासे विक्रीवर बंदी

◾️जिल्ह्यातील 133 मासेमारी करणार्‍या संस्थांना मत्स्य पालन विभागाचे पत्र

गोंदिया 10: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या थायलंड वाघूर या माशोळी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसे पत्र मत्स्य विभागाने मत्स्यपालन करणार्‍या संस्थांना दिले आहे. यापुढे ती विक्री करताना आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

गोंदिया जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. येथील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन आणि मासेमारी केली जाते. देशी मच्छीसह सरकारी वाघूर या मच्छीचे पालन देखील करण्यात येते. कमी वेळात हा मासा अधीक उत्पन्न देत असल्यामुळे या मास्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हा मासा जलजन्य जीवांकरिता धोक्याचा असल्यामुळे या मास्याचे पालन आणि विक्रीवर मत्स्य विभागाने बंदी घातली आहे. भारतीय मत्स्य प्रजातींना जीवांचे प्रजनन, पालन आणि वंश सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने थायलंड वाघूर मास्यांच्या विक्री आणि पालनावर बंदी घालण्यात आली आहे. थायलंड वाघूर मास्यांची विक्री करण्यात येवू नये, यासंदर्भात जिल्ह्यातील 133 मासेमारी करणार्‍या संस्थांना मत्स्य पालन विभागाने पत्र दिले आहे. त्यात थालबंड वाघूर तसेच बिग हेड मच्छीचे बीज उत्पादन, संवर्धन, आयात निर्यात विक्री आणि विपणणावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही कुणी विक्री किंवा पालन करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share