सुरतोली माध्यमिक विद्यालय- लोहारा स्नेह संमेलनाचे आयोजन

देवरी◼️ तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय- लोहारा येथे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष -डॉ. डिलनसिंह पवार, उपाध्यक्ष देवरी शिक्षण संस्था देवरी, उद्घाटक महेन्द्रजी मोटघरे, गटशिक्षणाधिकारी प.स. देवरी. दिप प्रज्वालन डॉ. दिलिप लटये, प्राध्यापक नागपूर, प्रमुख अतिथी म्हणून यु. जी कोरे( से.नि.शि) पन्नालाल चौधरी, सरपंच ग्रा.प. लोहारा, सौ. सुधा देवी पवार सदस्या देवरी शि. संस्था देवरी, भुवनेश्वरसिंह पवार, डॉ. कोल्हे, देसाई सर मुख्याध्यापक लोहारा, श्रीमती रझिया बेग प्राचार्या, सत्यवान गजभिये केन्द्र प्रमुख लोहारा, अमृता पवार, कैलाश मरस्कोल्हे सरपंच सुरतोली, सुखराम अगडे, उपसरपंच लोहारा, सत्यशिला टेभुर्णीकर, पो.पा. लोहारा, रविन्द्र क्षिरसागर पो. पा. मोहनटोला, भैय्याभाऊ दूबे, प्रेमसिंह परिहार, सावंत परिहार पो. पा., संगिता परिहार मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी महेन्द्र मोटघरे यांनी विद्यार्थ्याना कापी मुक्त परिक्षा देण्याचे आवहान केलेतर डॉ. दिलीप लटये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की अभ्यास व परिश्रमानेच आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष दुबे मुख्याध्यापक याने कार्यक्रमाचे संचालन डी. एस. सोनागरे, आभार एन.एल.नाईक यांनी मानले. या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थ्याचे पालक व नागरीक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share