इलेक्शन ड्युटीवर असलेल्या देवरीच्या शिक्षकाला मतदान केंद्रावर सर्पदंश

🚨आमगाव तालुक्यातील ग्राम बाह्मणी येथील मतदान केंद्रावरील घटना

Deori : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी देवरी येथील शिक्षकाला आमगाव तालुक्यातील बाह्मणी येथील मतदान केंद्रावर सापाने दंश केला. परिणामी त्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी शुक्रवारी पहाटे १ वाजता गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दीक्षांत प्रेमलाल धारगावे (३६, रा. शिक्षक कॉलनी, देवरी) असे शिक्षकाचे नाव आहे.

आमगाव तालुक्यातील बाह्मणी येथील मतदान केंद्रावर त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. गुरुवारी (दि.१८) रात्री जेवण केल्यावर ते शाळेच्या आवारातच फिरत असताना त्यांना सापाने दंश केला. परिणामी त्यांचा उच्च रक्तदाब वाढला. त्यांचा प्रथमोपचार रात्रीच आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१९) पहाटे १ वाजता दाखलकरण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.

Share