जय भिमच्या गर्जनेने दुमदुमली देवरीनगरी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

देवरी : भारतीय घटनेचेशिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहासह आदरभावात साजरी करण्यात आली आहे. दरम्यान शहरासह गावागावात शोभायात्रा, मिरवणूक काढून आंबेडकरी बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला. तसेच भिम गिताच्या तालावर आंबेडकरी बांधव चांगलेच थिरकले. यामुळे देवरी शहर भिम गर्जनेने सकाळपासूनच गजबजला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक उत्सव समिती तसेच आंबेडकरी बांधव कामाला लागले होते. ठिकठिकाणी जयंतीनिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात आले होते. देवरी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये चौकाचौकात विशेष व्यवस्था समाजप्रिय लोकांकडून करण्यात आली होती.

Print Friendly, PDF & Email
Share