२० पटसंख्येच्या आतील १८५ शाळांचे होणार बंद, नजीकच्या शाळेत समायोजन

◼️देवरी तालुक्यातील सर्वाधिक ४० शाळा बंद होणार?

गोंदिया : कमी पटसंख्या असलेल्या १८५ शाळांना कुलूप लावण्याचे संकेत शासनाच्या वतीने पाच वर्षांपूर्वी देण्यात आले होते. जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून, या जिल्ह्यातील अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. या दुर्गम भागातील शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर होत्या. या शाळांना कुलूप लागण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही सतावत होती. परंतु, आता या शाळा बंद होणार नाहीत, या शाळांचे समायोजन नजीकच्या शाळांत करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी एम. रंगनाथन यांनी काढले आहे.

कमी पटसंख्या असलेल्या जवळ जवळच्या दोन तीन शाळा एकत्र आणून समूह शाळा चालविण्याचा सरकारचा मानस असला तरी गोंदिया जिल्ह्यातील फक्त एकाच समूह शाळेचा प्रस्ताव शासनाला गेला आहे.

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत

आमगाव: २४, अर्जुनी-मोरगाव: १७, देवरी: ४०, गोंदिया: २२, गोरेगाव २४ , सडक-अर्जुनी: १८, सालेकसा: २६, तिरोडा२४ इतक्या शाळा बंद होणार आहेत.

जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांची ९४३ पदे मंजूर असताना त्यातील ७७३ जागा भरल्या आहेत, तर १८० जागा रिक्त आहेत. तसेच १३ पदवीधर शिक्षक अतिरक्त आहेत. जिल्ह्यातील २१० शाळांमध्ये महिला शिक्षक कार्यरत नाहीत.

एकूण विद्यार्थी- २,३५,७०३

संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक- ४,२६०

महिला शिक्षक- ९५५

भरलेली पदे- ३,५९६

रिक्त पदे- ६६४

गोंदिया जिल्ह्यातील सहायक शिक्षकांची २,७८९ पदे मंजूर असताना त्यातील २,५९६ जागा भरलेल्या आहेत, तर १९३ जागा रिक्त आहेत. तसेच २७ सहायक शिक्षक अतिरिक्त आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share