आरोग्य सहसंचालकांनी केली खोडशिवनी, गोठणगाव केंद्राची पाहणी

गोंदिया : आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी 22 एप्रिल रोजी आपल्या विदर्भ दौर्‍यातंर्गत जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्र व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कीटकजन्य व जलजन्य आजार कार्यक्रमाचा आढावा घेतला.

दौर्‍यादरम्यान त्यांच्यासोबत पुण्याचे राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, हिवताप व हत्तीरोग सहाय्य्क संचालक डॉ.श्याम निमगडे, सहाय्यक संचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, नगापूर सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. अजय दवले, नाशिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे डॉ. दावल सावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. पवार यांनी दुपारी 3 वाजता खोडशिवनी व संध्याकाळी 6 वाजता गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून आरोग्य संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेतला. दरम्यान आरोग्य केंद्राच्या आतील बाहेरील परीसर स्वच्छता, प्रसुतीकक्ष, वॉर्ड, औषधीसाठा, लसीकरण कक्ष, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया कक्ष आदींनी पाहणी केली. तसेच डॉ. पवार यांनी लोकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा देणे, आरोग्य संस्थेत प्रसुतीवर भर, मुख्यालयी वास्तव, आरोग्य योजना गावपातळीपर्यंत पोहचविणे, आरोग्य कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे, साथरोग रोखण्यासाठी गृहभेटी वाढविणे आदीविषयी सूचना केल्या. यावेही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटील, खोडशिवनीचे डॉ. शुभम लंजे, गोठणगावचे डॉ. देवेंद्र घरतकर, डॉ. मोनाली तर्हेकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी व गोठणगावचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share