सावधान 🚨 फूड कलर वापरून तयार केलेली बनावट डाळ जप्त

अन्न व औषध प्रशासनाने केली कारवाई

गोंदिया,  : अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑक्टोबर 2023 रोजी एका दुकानातून जप्त केलेली बटरी डाळीत सिन्थेटीक फूड कलर असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. याप्रकरणी विक्रेता, पुरवठादार व उत्पादकावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या गोंदिया कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे 19 ऑक्टोबर 2023 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी शितल देशपांडे यांनी गोंदिया शहरातील मालवीय वॉर्डातील मेसर्स प्रभुदास अट्टलमल येथे कार्यवाही करुन रंगीत बटरी दाळीचा नमूना घेतला. तसेच 30 हजार 96 रुपये किमतीच्या उर्वरित डाळीचा 418 साठा किलो जप्त केला होता. दरम्यान या दाळीत सिन्थेटीक फुड कलर टारटाझीन असल्याचे तपासाअंती स्पष्ट झालेले आहे. ही रंगीत बटरी दाळ तूरदाळ म्हणून बाजारात विक्री होत होती. या प्रकरणी विक्रेता चंद्रकुमार प्रभुदास भक्तानी व मध्यप्रदेशातील पुरवठादार व उत्पादक यांच्याविरुध्द न्यायालयीन कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना त्याच्या वेष्टनावर उत्पादकाचा पूर्ण पत्ता, उत्पादन दिनांक, बॅच नंबर, अन्नपदार्थाचा सर्वोत्तम कालावधी, एफएसएस-1 परवाना क्रमांक नमूद असलेले अन्नपदार्थच खरेदी करावेत. अन्नपदार्थ ज्या नावाने खरेदी केले आहे त्याचे खरेदी बील स्वत:कडे ठेवावे व विक्री करतांना त्याच नावाने विक्री करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share