गोटानपार येथील विनयभंग व हत्या प्रकरणातील दोषींना अटककरुन पिडीत कुटुंबास न्याय द्या: भाजप
◼️भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे उपविभागीय अधिकारी देवरी यांना निवेदन
देवरी ◼️ तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत गोटानपार येथे दिनांक 19/04/2024 रोज शुक्रवार ला आपल्या नातेसंबंधात विवाह प्रसंगी उपस्थित राहण्या करिता आदिवासी दलीत परिवार आले असता या परिवारातील 12 वर्षीय मुलीवर अज्ञात आरोपीनी अतिप्रसंग करित सदर आदिवासी दलीत मुलीची निर्घुण हत्या केली.
सदर घटनेतील पिडीतांची मुलीचा विनयभंग करुन तिची हत्या करण्यात आली. घटनेला तिन दिवस उलटुन देखील आरोपीचा शोध लागलेला नाही, त्या बाबत आदिवासी समाजामध्ये तिव्र असंतोष निर्माण होत आहे.
सबंधितआरोपींना तत्काळ अटकरुन सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा, अन्यथा भारतीय जनाता पार्टी महिला आघाडी च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीना तत्काळ अटक करावी या करिता निवेदन देण्यात आले.
यावेळी देवकी मरई, सविता पुराम, अंबिका बंजार , कौशल कुंभरे, पिंकी कटकवार यांच्या सह भाजप महिला आघाडी देवरीच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.