देवरी येथे दमा या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर संपन्न

◼️सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम

◼️३२७ गरजू रुग्णांनी घेतला सहभाग

देवरी – गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिर सभागृहात सुवर्णप्राशन फाऊंडेशन,दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि माँ धुकेश्वरी मंदिर समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमा चे औचित्य साधून दमा,जुनाट सर्दी अस्थमा अश्या प्रकारची आजार बरे होण्यासाठी आणि समाजात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला रुग्णांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला असून जिल्हयांतर्गत आणि आंतरजिल्ह्यातील जवळपास ३२७ रुग्ण सहभागी झाले असून,आयुर्वेदाचार्य सुनील समरीत आणि डॉ.रुपेश परशुरामकर यांनी त्यांची चिकित्सा करून २२७ रुग्णांना दमा या आजाराच्या औषधी चे मोफत वितरण माँ धुकेश्वरी मंदिर समिती चे अध्यक्ष मा.ॲड.प्रशांत संगीडवार,मंदिर समितीचे सचिव सुशील शेंद्रे,प्रतिष्ठित नागरिक बंसीलालजी बंग, सुवर्णप्राशन फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष मा.आयुर्वेदाचार्य सुनील समरीत,बिरसा ब्रिगेड चे संघटक मा.चेतनदादा उईके,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.कुलदिप लांजेवार,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मा. विनोद चौधरी,सुवर्णप्राशन चे सचिव मा.डॉ.रुपेश परशुरामकर,विश्वस्त मा.प्रा.दिलीप बोरकर,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे सहसचिव मा.प्रशांत सावलकर, हस्ते वितरण करण्यात आले असून शरद पौर्णिमा आणि दमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने आणि दिवसेंदिवस हे आजाराची लागण वाढत असल्याने दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा च्या दिनी हे शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.शिबिराच्या आयोजनासाठी सुवर्णप्राशन फाऊंडेशन च्या सहसचिव सौ.हितेश्री समरीत, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे सचिव कल्याणी लांजेवार,विश्वस्त दिपक लांजेवार,शिक्षक संघटनेचे दुधराम कुंभरे,रंजीत धमगाये,तपेश काशिवार,सुरेश सरोटे, हर्षवर्धन मेश्राम यांच्या सह मंदिर समिती आणि दोन्ही सामाजिक संस्थेच्या विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share