नागपूरकरांनासाठी मानाची बाबजगातील पहिला स्मार्ट सोलर लाईट सिस्टिम केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या घरी

केंद्रीय मंत्री, श्री नितीन गडकरी एक अशी व्यक्तिमत्त्व ज्यांनी उत्कृष्ट एक्सप्रेसवे आणि बंदरे बांधली आणि ज्यांनी देशाच्या पायाभूत सुविधांचा कायापालट केला. ते एक सफल व्यवसायी सुद्धा आहेत त्यांनी नावीन्य पूर्ण कल्पनांना नेहमी प्रोत्साहन दिला आहे . जेव्हा जेव्हा कोणतीही कल्पना चौकटीबाहेर असायची तेव्हा ती सरकारला मान्य व्हायला जास्त वेळ लागायचा पण ही प्रथा गडकरीजींनी बदलली. त्यांनी एकट्याने ग्रीन हायड्रोजन, जीवाश्म इंधनमुक्त, इलेक्ट्रिक, जैवइंधन आधारित वाहतूक इत्यादी प्रकल्पांद्वारे वाहतुकीचा दृष्टीकोन बदलला.

गडकरी जी आपल्या भाषणात म्हणतात, विजेचा पुरवठा ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे आता तर विजेच्या सहाय्याने धावणारी स्वयंचलित वाहनेही वापरात आहेत या सर्वांवर उपाय म्हणजे गैर पारंपरिक ऊर्जेचा वापर. आता सध्या स्थितीत सार्वजनिक ठिकाणी सौर दिवा लावण्याचं एक पाऊल उचललं गेलं तरी सुद्धा बरीच वीज वाचेल आणि ती इतरत्र वळवता येईल.

नुकतेच डॉ. शिरीष खेडीकर यांनी माननीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री श्री नितीन गडकरी जी यांची भेट घेतली. अत्यंत कार्यक्षम स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीमच्या पेटंट तंत्रज्ञानाने ते प्रभावित झाले. गडकरीजी आणि डॉ. खेडीकर यांची ट्रॅकिंग क्षमतेसह सौर पथदिव्याची गरज आणि फायदे यावर दीर्घ चर्चा झाली विशेषत: रस्ते, महामार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी शून्य उत्सर्जन असलेल्या प्रकाशासाठी अशा शोधाची फार गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरीजींशी चर्चा करत असतांना डॉ. खेडीकर यांच्या लक्षात आले कि गडकरी साहेबांच्या बाल्कनी आणि टेरेस वर लाईट ची आवश्यकता आहे आणि लांब वायर द्वारे तिथे लाईट ची व्यवस्था केली जाते आणि ते फार कष्टाचे काम आहे आणि त्यात विजेचा फार वापर होतो.

चर्चा सुरु असतांना डॉ खेडीकर यांच्या मनात कल्पना आली कि स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट चा सर्व प्रथम वापरासाठी गडकरी साहेब साहेबांच्या घरापेक्षा उत्तम जागा दुसरी असू शकणार नाही आणि त्यांनी गडकरीजींच्या घरी दोन स्मार्ट सोलर लाईट लावणाची इच्छा व्यक्त केली आणि गडकरी साहेबांनी ती मान्य केली .

तुम्हाला आश्चर्य आणि गर्व वाटेल कि सोलर ट्रॅकिंगची क्षमता असलेले इनबिल्ट ऑल इन वन स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट हे संपूर्ण जगाच्या इतिहासात सर्व प्रथम श्री गडकरीजींच्या नागपूर येथील निवासस्थानी
लावण्यात आले आहे.

स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट लावल्यानंतर गडकरी साहेबांनी याची स्वतः पहाणी केली आणि त्याची कार्य प्रणाली समझून घेतली. मोबाइलला द्वारे सुरु-बंद करून, प्रकाशाच्या प्रखरतेस कमी जास्त करून आणि गती शोध आधारित प्रकाश (मोशन डिटेक्शन लाईट) हे व्यवस्तीत कार्य करते याची खात्री करून घेतली. लवकरच सर्व पारंपारिक पथदिवे बदलून असे नाविन्यपूर्ण सौर पथदिवे लावले जातील, असे त्यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share