मिसपिर्रीच्या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत वृक्षरोपण

देवरी 18: जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मिसपिर्री येथे शाळेच्या आवारात ककोडी क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्या अनुसयाताई जीवनलालजी सलामे,मिसपिर्री गावचे उपसरपंच जीवनलाल बिसराम सलामे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल प्रेमलालबडवाईक यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राजेश नंदेश्वर,नरेंद्र नंदेश्वर, सुरेंद्रजी धुर्वे, रवींद्र वालदे, होतीलाल सलामे, गणेश दररो, बसंता बाई द्वारका सलामे, ललिताबाई सयाम तसेच अन्य महिला सदस्य उपस्थित होते. देशाचे उज्वल भविष्य शाळेच्या ज्ञान मंदिरातून निर्माण होते असे विचार मिसपिर्री गावचे उपसरपंच जीवनलाल सलामे यांनी व्यक्त केले.

शिक्षकवृंद विशाल नागरे , मलगाम , शरद शेंडे उपस्थित होते. जि. प.केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष रंगारी यांनी आमची शाळा आदर्श शाळा या अदानी फाउंडेसन च्या उपक्रमात सहभागी असून लोकवर्गणी तुन शाळेचा विकास करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.पंचायत समिती सदस्यां अनुसया ताई तसेच मिसपिर्री गावातील सर्व पालकांनी एकमताने शाळेला सर्व सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share