
महावितरणच्या मुल्ला उपकेंद्रावर सरपंच आणि शेतकऱ्यांचे भारनियमनाविरुद्ध हल्लाबोल !
◼️पुराडा-लोहारा- मुल्ला गावांना अघोषित भारनियमनाचा फटका, शेतकरी आणि जनसामान्याचे बेहाल
◼️इलेक्ट्रॉनिक साहित्य व कामकाजात मोठे नुकसान
देवरी : देवरी तालुक्यात पुराडा, लोहारा, सुरतोली, मुल्ला या गावांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत असून मागील २ महिन्यापासून विजेच्या लपंडावाची आणि भारनियमनाची संतापजनक समस्या वाढलेली आहे. उन्हाळ्याच्या तापमानवाढीमुळे विजेअभावी आरोग्यावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. कृषीप्रधान देशाचा शेतकरी राजा विजेच्या लपंडवामुळे आणि भारनियमनामुळे चिंतेत पडला असून शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
उपकेंद्र ३३ के/वी मुल्ला येथील उपभोक्ते शेतकरी व गावकरी मागील २ महिन्या पासून सतत विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे तसेच अघोषित भारनियमन फक्त मुल्ला उप-केंद्र येथेच लावले आहे या पासून नागरिकांना असह्य मानसिक त्रास तथा लहान बालकांना विजेच्या अघोषित भारनियमनामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मुल्ला उप-केंद्र अंतर्गत येणारे सर्व गाव आदिवासी नक्षल प्रभावित भाग म्हणून शासनस्तरावर याची नोंद असून सुद्धा वीज वितरण कंपनी येथील लोकांवर अन्याय करत असल्याचे निदर्शनात येत असल्याने सर्व गावांवरील अघोषित भारनियमन कायम बंद करणे त्याबद्दल कनिष्ठ अभियंता यांना निवेदन सादर केले आहे.
पुराडा आणि लोहारा परिसरातील लगतच्या गावांना सुरळीत विद्युत पुरवठा होत असून पुराडा आणि लोहारा गावावर अन्याय का ? याचा जाब विचारण्यासाठी परिसरातील शेतकरी काल मुल्ला सब स्टेशन येथे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. आज दि २२ ला सुरतोली ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंचासह गावकऱ्यांनी निवेदन सदर करून ३३के/वी उप-केंद्र मुल्ला येथील दिवसाचे आणि रात्रीचे भारनियमन नियमित केले नाही तर उपकेंद्र अंतर्गत सर्व नागरिक उपकेंद्रवर मशाल घेऊन निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
राजकीय मंडळीनी विद्युत पुरवठा आणि भारनियमन सुरळीत होणार असल्याचे श्रेय लोटण्यासाठी गाजावाजा करीत नवीन ट्रांसफार्मर सोबत फोटोसेशन करून नागरिकांना लॉलोपॉप दिल्याचे चर्चा रंगल्या आहेत. फोटोसेशन नको भारनियमन बंद करून वोट बँक असलेल्या नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्या असी मागणी माजी जिप सदस्य दिपक पवार यांनी केली आहे.
यावेळी सरपंच कैलास मरस्कोल्हे, युगेश पवार, रवींद्र पातोडे, राकेश पवार, संजय सोमवंशी , रोशन दुबे , रंजित टेटे, राजू राऊत , देवेंद्र पवार ,आदी गावकरी उपस्थित होते.