आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापन करने म्हणजे पुण्यकर्म: प्राचार्य कमल कापसे
🟥पुराडा येथील शासकिय आश्रम शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
देवरी 18: शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथील इंग्रजी शिक्षक डी.आर.गजभीये हे नियतकालीन वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्त सत्कार प्रसंगी शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांना अध्यापन करने म्हणजे अत्यंत पुण्यकर्म आहे .
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे कार्यरत इंग्रजी शिक्षक डि.आर.गजभीये हे ३१ आॅगस्ट ला सेवानिवृत्त झाले त्यांचा सपत्नीक सत्कार शाल, श्रीफळ,सर्ट प्यांट साडी व भेटवस्तू स्वरूपात घड्याळ देऊन नुकताच प्राचार्य कमल कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी प्रास्ताविकात बोलताना प्रा.संदीप बिसेन यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे मराठी शिक्षक अरविंद बागडे यांनी गीतगायन करीत वातावरण मंत्रमुग्ध केले.सेवानिवृत्त शिक्षक गजभिये यांनी आपल्या जिवनाची यशोगाथा सांगत अथक परिश्रम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, असे सांगून शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार मानले. आणि प्राचार्य कमल कापसे यांच्या खाली काम करताना कसे दिवस गेले कळलेच नाही, असे सांगून भावविवश झाले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.बलवंत सोमवंशी,प्रा.माया बोपचे,प्रा.वैयजंती नेनावत,प्रा.रवि गणवीर,प्रा.देवा मेश्राम, सुजाता मेश्राम, भोजराज लंजे, मोरेश्वर धवने,कु.वृशाली येरने,कु.कोरे,कु.वर्षा
सांगोळे,कु.दुर्गा लांजेवार,कु.प्रिती खंडाते, अशोक फुंडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय टेंभरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.राजेश हट्टेवार यांनी केले.