ओळखलेत का सर आम्हाला ? 1997 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांची सेवानिवृत्त प्राचार्यांना भेट
डॉ. सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी 14: ओळखलंत का सर मला पावसात आला कुणी…! कुसूमाग्रजांची कविता सर्वांना आठवतच असेल. असाच एक प्रसंग देवरी येथील एका शाळेत बघावयास मिळाला. 1997 बॅच च्या विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त प्राचार्यांची भेट घेऊन आठवणी ताज्या केल्या.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे शब्दात व्यक्त करता येत नाही. शिक्षकाचा खरारूप त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत असतो. शिक्षक आपल्या जीवनात कितीतरी विद्यार्थ्यांना घडवीत असतो ज्ञानदानासोबत विद्यार्थी उत्तम नागरिक कसा घडेल याची चिंता प्रत्येक शिक्षकाला नक्कीच असते. आणि जेव्हा स्वतः शिकविलेले विद्यार्थी उच्चपदावर विविध क्षेत्रात प्रगती करतांना दिसतात तेव्हा त्या शिक्षकाची मान अभिमानाने उंच होते.
असाच एक प्रसंग देवरी येथील मनोहरभाई पटेल माध्यमिक व जुनिअर कॉलेज येथे घडला. 1997 च्या विज्ञान शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य के सी शहारे यांच्या सह शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रा. सुनंदा भुरे , प्रा. रोशन नागदेवे , प्रा. गोवर्धन मेश्राम , प्रा. पंचभाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी 1997 बॅच चे विद्यार्थी नूतन कोवे , हर्षवर्धन सिद्धू , रवी गणवीर , सुरेंद्र वलथरे ,योगेश बंग ,सुनील अग्रवाल ,संजय कुरसुंगे , सतीश झिंगरे , राधेश्याम कोटवार ,शिवराज भैसारे आदी विद्यार्थी उपस्थित होते.