आदर्श शाळा सावली येथे अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

देवरी : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त आदर्श शाळा सावली येथे दिनांक 13 व 14 ऑगस्टला मुख्याध्यापक दीपक कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन पदाधिकारी उपस्थित होते. हर घर झेंडा अभियाना विषयी जनजागृती केली. शाळेतील विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा चित्रकला, रांगोळी, गीत गायन ,वक्तृत्व इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच उरलेल्या स्पर्धा पुढील दोन दिवसात घेऊन त्यामध्ये प्रथम द्वितीय येणाऱ्या क्रमांकाला भेटवस्तू देण्यात येईल. आज दिनांक 15 ऑगस्ट ला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बींजलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सौ झुलनताई पंधरे सरपंच, राजेश्वरी बिजलेकर उपसरपंच, परिहारजी उपाध्यक्ष शा. व्य.स., कैलास भेलावे , पांधरेजी ग्रा.प.स., चंद्रसेन रहांगडाले पो. पा., प्रवीण सोनटक्के,डूडेश्वर गाहाने, कमल सिंग राठोड, गौतम ताई, छानेश्वरीताई वैद्य, शहारे ताई, शेंडे ताई, व इतर सर्व गन मान्य ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिवणकरजी ग्रामसेवक, शेंडे सर ,वालदे मॅडम, चांदेवार सर कोवले सर ,लांजेवार सर ,सुनील भेलावे, ललित पवार, मीनाताई राठोड यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share