608 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, सरपंच निवड पुन्हा जनतेतून होणार

राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.. त्यानुसार, येत्या 18 सप्टेंबरला या निवडणुकीसाठीचे मतदान, तर 19 सप्टेंबरला मतमोजणी होईल.. त्यासाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली.

शिंदे सरकारच्या निर्णयानुसार, या निवडणुकीत पुन्हा एकदा सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. शिवाय, ‘ओबीसीं’ना राजकीय आरक्षणही लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

पावसाची शक्यता नसलेल्या ठिकाणी तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश 17 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.. त्यानुसार, राज्यातील 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जाहीर केला..

निवडणूक कार्यक्रम

▪️ 18 ऑगस्ट – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध.
▪️ 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर – उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी. (शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही)

▪️ 2 सप्टेंबर – उमेदवारी अर्जाची छाननी.
▪️ 6 सप्टेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत)- अर्ज माघारीची वेळ
▪️ 18 सप्टेंबर – रोजी मतदान
▪️ 19 सप्टेंबर – मतमोजणी.

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती आल्यास, याबाबत तात्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share