देवरी नगरपंचायत चे गटनेते शैंकी भाटिया यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

■ या निमित्य विद्यार्थ्यांना नोटबुक, वृक्षारोपण व रुग्नाना फळ वाटप

प्रतिनिधि/ देवरी, ता.१२: देवरी नगरपंचायत चे काँग्रेस पक्षाचे गटनेता तथा नगरसेवक सरबजीत सिंग उर्फ शैंकि भाटिया यांनी आपला ३३ वा वाढदिवस आज शुक्रवार (ता.१२ ऑगस्ट) रोजी देवरी येथील जी.प. शाळेत तथा भागी ,नवाटोला व शिरपुरबांध येथील जी.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.या निमित्य सदर शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक चे आणि देवरी च्या ग्रामीण रूग्णालयातील रुग्णाना फळ वाटप करुण तसेच देवरी च्या जी.प.शाळेत वृक्षारोपण करुण मोठ्या उत्साहत साजरा केला.


नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांच्या वाढदिवसानिमित्य देवरी येथील जी.प.शाळेत या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. तसेच या शाळेतच वृक्षारोपन ही करण्यात आले. या सर्व कार्यक्रमा प्रसंगी गटनेते सरबजीत सिंग भाटिया हे आपल्या पत्नी व मूली सोबत तसेच देवरी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटिया , जिल्हा महासचिव बळीराम कोटवार, नगरसेवक नितिन मेश्राम, शकील कुरैशी, पंकज शहारे, नगरसेविका सुनिताताई शाहू, हिना टेम्भरे, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, देवरी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक एम.के.सयाम, भागी येथे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अमृतकर सर, रोशन भाटिया, अमित तर्जुले, अंतरिक्ष बहेकार, नरेश राऊत, जयपाल प्रधान, कमलेश पालीवाल यांच्या सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share