लायंस क्लब देवरीच्या वतीने बाघनदी येथील पोलीस कमांडो दला सोबत सामुहिक रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

प्रतिनिधी /देवरी, ता.१२: लायंस क्लब देवरीच्या वतीने नजीकच्या छत्तीसगढ़ राज्यातील बाघनदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ई. समवाय ३८ वाहिनी भा.ति.सी. पोलीस कमांडो दल येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुरुवार(ता.११ ऑगस्ट) रोजी भेट घेवून त्यांना सामूहिक रित्या राख्या बांधून व मिठाई वाटप करून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. या सोबतच देशाच्या अमृत महोत्सवा निमित्य हर घर तिरंगा या अभियानाचा प्रचार व प्रसार ही करण्यात आला.
या प्रसंगी भा.ति.सी. पोलीस दलाचे असिस्टेंट कमांडर अभिषेक मधुकर, इंस्पेक्टर प्रवीण नुतियाल, सब इंस्पेक्टर संतोष कुमार सिंग, ए.एस.आय. निरंजन सिंग यांच्या सह जवळपास ५० पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून व मिठाई चारुन रक्षाबंधन हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी लायंस क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार सचिव आफताब शेख उर्फ अनुभाई, सचिव ज्योति रामटेककर, कैबिनेट ऑफिसर पिंकी कटकवार, सदस्य पुष्पा नळपते, प्रज्ञा सावंत, अनिल मेश्राम यांच्या सह क्लब चे इतर पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान क्लब च्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव निमित्य हर घर तिरंगा चा अभियाणाचे प्रचार व प्रसार ही करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share