रब्बी धानाची खरेदी सुरू करून तत्काळ चुकारे देण्यात यावे : राकाँपा देवरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
देवरी 12:
जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरीप व रब्बी धानाची शासकीय दरात खरेदी करण्यात येते यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची सातबारा ऑनलाइन करून उन्हाळी रब्बी धान पिकाची खरेदी शासकीय धान खरेदी केंद्रामार्फत तालुक्यात सुरू करण्यात आली परंतु अर्ध्यावरच धानाची खरेदी थांबविण्यात आली त्यामुळे आजही तालुक्यात जवळपास 50 ते 60 टक्के शेतकरी आपले सातबारा ऑनलाइन करूनही खरेदी केंद्र सुरू होईल या प्रतीक्षेत आहेत या प्रतीक्षेत अतिवृष्टी व पावसामुळे तसेच साठवणुकीच्या अभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे घरी पडून असलेले धान ओले झाले असून खराब होत आहेत एवढेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांचे धान खरेदी झालेले आहेत अशा बहुतांश शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आजही मिळालेले नाही व प्रलंबित आहेत.
सध्या खरीप हंगामात रोवणीचे काम सुरू असून शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके यासारखे खर्च शेतकऱ्यांसमोर आहेत परंतु शासनाने अजून पर्यंत धानाचे चुकारे न दिल्याने तसेच धानाची खरेदी बंद केल्याने शेतकरी पुन्हा सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली जात आहे व शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत विदारक अशी झाली आहे करिता शासनाने त्याचा गंभीरपणे विचार करून धानाचे चुकारे निकाली काढावेत तसेच अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेल्या रब्बीच्या धानाची शासकीय दरात त्वरित खरेदी करावी अशी मागणी देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. मुख्यमंत्री महा. शासन यांना मा.उपविभागीय अधिकारी, देवरी मार्फत निवेदनातून केली आहे.
यावेळी निवेदन देतेवेळी प्रामुख्याने रमेश ताराम विधानसभाध्यक्ष, सी.के.बिसेन तालुकाध्यक्ष, पारबताबाई चांदेवार महिला तालुकाध्यक्ष, नेमीचंद आंबिलकर माजी सभापती,पंकज शहारे नगरसेवक, हिना टेंभरे नगरसेविका तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.