अठरापगड जातींना स्वाभिमान मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले – डॉ दिगांबर कापसे

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे पहिले कैवारी होते. – डॉ दिगांबर कापसे

समर्थ महाविद्यालयात सुस्वराज्य दिनानिमित्त व्याख्यान

स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज ६ जून “शिवराज्याभिषेक” दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व प्रमुख वक्ते माजी प्राचार्य व प्रसिद्ध साहित्यिक प्रल्हाद सोनेवाणे व प्रमुख अतिथी म्हणून तुकडोजी महाराज अध्यासन मंडळ प्रमुख डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे. असे आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्ते प्रल्हाद सोनेवाणे यांनी शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातील क्षण याप्रसंगी मांडल्या. तुकडोजी महाराज अध्यासन मंडळ प्रमुख व मराठी अभ्यासक डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील रामचंद्रपंत अमात्य यांच्या बखरी या ग्रंथातील सार या प्रसंगी मांडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शिवाजी महाराज हे १८ पगड जातींचे राजे होते. समाजामध्ये सुराज्य आणि सुस्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रथमतः प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ८०% समाजकारण केले आणि २०% राजकरण केले, त्यामुळे ते जनतेचे राजे होते. याप्रसंगी त्यांच्या सुस्वराज्य दिनाच्या अनुषंगाने आपण त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे. आपणही काही समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे. 348 वर्षानंतर ही आपण त्यांची जयंती त्यांचा राज्याभिषेक दिन आपण साजरा करतो याचे कारण की, त्या राजानं बहुजनांसाठी केलेले कार्य हे मोठे होते. त्यामुळेच बहुजनांचे पाहिले कैवारी आपण त्यांना म्हणू शकतो. या दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांशी समरस झालो तर हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे ते याप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बंडू चौधरी, प्रास्ताविक प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, तर आभार प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share