एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश पूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी

देवरी 31 : देवरी – एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ची प्रवेश पूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 01 या वेळेत होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. ही प्रवेश प्रक्रिया सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सहावीच्या रिक्त जगासाठी आणि सातवी ते नववीच्या रिक्त जगाचे अनुशेष भरून काढण्यासाठी राबविण्यात येत आहे. परिपत्रकात म्हटले आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जिल्हा गोंदिया अंतर्गत कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व अर्ज ऑफलाइन पद्धतीने देण्याचे आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक द्वारा आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी प्रस्तावित केलेले होते.
राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल
मधील सहावीच्या रिक्त जगासाठी आणि सातवी ते नववीच्या रिक्त जगाचे अनुशेष भरण्याकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, देवरी द्वारे तपासणी करून विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आलेले आहेत.

यादी प्रकल्प कार्यालयात तालुकानिहाय लावण्यात आली आहे यामुळे विद्यार्थ्याचे पालक तथा शिक्षकांनी भेट देऊन खात्री करावी तसेच प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षेला येणाच्या अगोदर पाल्य/पालकांनी व संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील सहावीच्या वर्गात 60 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया संदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक या संस्थेस राहील त्यात प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 01 या दरम्यान होईल.
गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, बोरगाव बाजार चीचगड रोड
तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 09.00 वाजता हजर राहावे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना निळा पेन, पेपर पॅड, पाणी बॉटल एवढेच साहित्य सोबत नेता येणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा, अनुदानित शाळा व इतर शाळांच्या मुख्याध्यापक/शिक्षक तसेच पालकांची आहे.

Share