जे.एम.टेम्भरें उच्चश्रेणी मुख्याध्यापक जि.प. केंद्रीय प्रा.शाळा लोहारा येथून सेवानिवृत्ती
देवरी 31: तालुक्यातील जि. प. केंद्रिय प्राथ. शाळा लोहारा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक जे.एम.टेम्भरें हे वयोमानानुसार आज नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख सत्यवान गजभिये, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.या प्रसंगी सत्कार मूर्तीचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यांत आला. व सत्कारमूर्तीच्या कार्यावर व जीवनावर प्रकाश टाकून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.