समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे “एक सूर एक ताल” कार्यक्रमभारत युवक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रम

Lakhni 03:
स्थानिक लाखनी येथे आज समर्थ महाविद्यालय, लाखनी आणि भारत युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने “एक सूर एक ताल” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दांडी स्मृती या निमित्याने हा कार्यक्रम समर्थ महाविद्यालय येथील भगिनी निवेदिता सभागृह येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक, युवक बिरादरी (भारत) सरिता फुंडे, संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, डॉ. चंद्रकांत निंबार्ते महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. दिगंबर कापसे, वर्षा मनोज दाढी प्रामुख्याने उपस्थित होते. एक सूर एक ताल हा कार्यक्रम महाराष्ट्रातून २० जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांसोबत साजरा होत आज लाखनी येथे समर्थ महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्याना त्यांनी नृत्य, गायन आणि अभिनयातून प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे संयोजक, प्रशांत वाघाये व संचालक, नागेंद्र राय असून भारतातील विविध राज्यातून आपल्या कलेमध्ये प्रवीण असलेले कलाकारांची उपस्थिती होती. यात गायक अतुल सुंदरकर,एकता जोशी, गुजरात, नृत्य कलेत पारंगत असलेले अक्षय जाधव, सरिता बाला, उडीसा, हेमांगी पीसाट, तनाया प्रभु, राजेय वतनदार, राकेश चव्हाण, विजय घरणिया, वाद्यवृंद कृष्णा रत्नपारखी, पंकज उनोने, प्रवीण पवार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. भारतातील १५ भाषांवर प्रभुत्व असलेले कार्यक्रमाचे संचालक नागेंद्र राय यांनी आपल्या हसत खेळत ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना ५ तास खेळवत ठेवले. भारत युवक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रकामाची दखल गिनीज बुकमध्ये नोंद असून त्यांचे कार्य भारत भर चालत असून वृक्षारोपणा पासून तर विद्यार्थ्यांमध्ये कला गुण विकसित करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. कार्यक्रम संयोजक, प्रशांत वाघाये मूळ लाखनी येथील असल्यामुळे महाराष्ट्र भर कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता आपल्या मूळ गावात या ज्ञानाचा फायदा आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून हा कार्यक्रम लाखनी येथे आयोजित करण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध असलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःहून सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला भाषणापेक्षा कला आणि कृतीवर भर दिला गेलेला होता. प्रकल्प संचालक, युवक बिरादरी (भारत) सरिता फुंडे, संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, डॉ. चंद्रकांत निंबार्ते महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. दिगंबर कापसे यांनी या विद्यार्थी निष्ठ उपक्रमाची स्तृती केली असून भविष्यात तालुक्यातील 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांना एकत्रित करून हा उपक्रम घेण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात संयोजक, प्रशांत वाघाये यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांनी महाराष्ट्र भर दौरा यशस्वी करून आज लाखनी येथे आगमन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन नागेंद्र राय आणि आभार डॉ दिगांबर कापसे यांनी मानले.

Share