कालव्याच्या दुरुस्ती व रोड रस्ते बांधकामासाठी ५५ कोटी रुपयांची निधी मंजूर
■ राज्याच्या अर्थसंकल्पनात आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नाला यश
देवरी २४: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील वाघ प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सिरपूरबांध, पुजारीटोला व कालीसराड धरणातील उजवा व डाव्या कालव्याच्या दुरुस्ती व नवीनीकरणकरिता २५ कोटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रोड-रस्ते नवीन बांधकामाकरिता २५ कोटी आणि आदिवासी बांधकाम विभागातून रोड-रस्ते बांधकामाकरिता ५ कोटी रुपये निधी अशाप्रकारे एकूण ५५ कोटी रुपयांची निधी राज्याच्या अर्थसंकल्पात आमदार सहषराम कोरोटे यांच्या मागील दोन वर्षापासून शासनासोबत केलेले पाठपुरावा व प्रयत्नाने मंजूर झाले असून यामुळे आता वाघ कालीसराडच्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामांना व रोड-रस्ते बांधकामांना वेग येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की, माझ्या आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सिरपूरबांध धरणासोबत पुजारीटोला व कालीसराड धरणाचे बांधकाम १९७० साली महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या राज्यात एकूण ५० हजार हेक्टर शेतजमिनीचे सिंचन केले जाते. परंतु मागील ५० वर्षांपासून या धरणातून सिंचनाकरिता तैयार करण्यात आलेल्या उजव्या कालव्याचे ६५ की.मी. व डाव्या कालव्याचे ६० की.मी.अंतर च्या कालव्याचे दुरुस्ती अभावी जवळपास १० हजार हेक्टर शेत जमिनीचे सिंचनाचे पाणी पाया जात आहे. या कालव्याच्या दुरुस्ती करिता मागील २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात हा मुद्दा आमदार कोरोटे यांनी ठेवून या कालव्याच्या दुरुस्ती साठी मंजूर एकूण १३३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. परंतु त्या वेळी राज्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासनाने निधी उपलब्ध करून दिली नाही. नंतर गप्प न राहता आमदार कोरोटे यांनी सदर निधीसाठी वारंवार शासनाकडे मागणी केली. अखेर यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पनात २५ कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली. या निधीच्या तरतुदीमुळे सदर कालव्याच्या मातीकाम, लाईनिंग व नवीनीकरण दुरुस्तीसाठी उपयोग केला जाईल. त्यामुळे या कालव्यातून वाया जाणारे १० हजार हेक्टर शेती जमिनीच्या पाण्याचे लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळणार असून यामुळे यांच्या सिंचनावर भर पडणार आहे.
त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्राच्या रोड-रस्ते करीता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ कोटी रुपये निधी व आदिवासी बांधकाम विभागाकडून रोड-रस्ते बांधकामासाठी ५ कोटी रुपये निधी अशा प्रकारे राज्याच्या २०२२-२३ अर्थसंकल्पात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ५५ कोटी रुपयाचे निधी मंजूर करण्यात आले आहे. या मंजूर निधीमुळे निश्चित वाघ कालीसराड कालव्याच्या दुरुस्ती व क्षेत्रातील रोड-रस्ते बांधकामाला वेग येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सहषराम कोरोटे यांनी दिली.
मागील दोन वर्षापासून शासन स्तरावर सतत पाठपुरावा व प्रयत्न केल्याने विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता एकूण ५५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळविण्यात आमदार कोरोटे यांना यश मिळाले आहे. या यशाबद्दल आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य लोकांनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.