◾️भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही (PHC) दवाखान्यात ही घटना घडली आहे
डॉक्टरांने चपराशाला केली बमारहाण, भंडाऱ्यातला संताजपनक व्हिडीओ pic.twitter.com/F3G9oJLUrc
— News18Lokmat (@News18lokmat) March 24, 2022
भंडारा, 24 मार्च : रुग्णांची सेवा करणाऱ्या एका डॉक्टराने आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील चपराश्याला गळा आवळून लाथा-काठीने अमानुष मारहाण केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही दवाखाण्याची घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या गोबरवाही दवाखान्यात ही घटना घडली आहे. डॉ. कडस्कार असं मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. तर नारायण उइके असं मारहाण झालेल्या चपराश्याचे नाव आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच डॉक्टर कडस्कार याने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे संपुर्ण प्रकार समोर आला आहे.








