स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्तस्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचे आयोजन

गोंदिया,दि.24 : जिल्ह्यातील सर्व 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग व इतर विभाग तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य व समन्वयाने स्क्रिनींग (अचुक वजन व उंची) करुन सदर वजन व उंचीच्या नोंदी केंद्र शासनाच्या POSHAN Tracker app मध्ये अचुकपणे नोंदवून आपल्या पाल्ल्याची श्रेणी तपासून घ्यावी व बालक-बालिका अतितीव्र कुपोषित (SAM) श्रेणीत येत असेल तर अशा बालकांना पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), बाल उपचार केंद्र (CTC), ग्राम विकास केंद्र (VCDC) मध्ये दाखल करुन त्यांना सामान्य श्रेणीमध्ये आणण्याकरीता प्रयत्न केले जातील.
त्याकरीता जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण, जागरुक व आपल्या पाल्ल्याप्रती आस्था असणाऱ्या प्रत्येक पालकांनी 21 ते 27 मार्च 2022 या दरम्यान आपल्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, नजीकचे खाजगी रुग्णालय किंवा अंगणवाडी केंद्र येथे नेऊन त्यांचे अचूक वजन व उंची घेऊन Poshan Tracker app वर सदर बालकाची नोंदणी करुन आपल्या पाल्ल्याची पोषणविषयक स्थिती जाणून घ्यावी व या स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर यांनी केले आहे.
00000

Print Friendly, PDF & Email
Share