लोक अदालत : महावितरणच्या 121 प्रकरणांचा निपटारा; ₹15.80 लाखांची थकबाकी वसुली
गोंदिया : महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने महावितरणने थकीत दारांना नोटीस देऊन लोक अदालत मध्ये प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. लोकअदालतमधून महावितरणच्या एकूण 121 प्रकरणांचा तडजोडीने निकाल काढण्यात आला. महावितरणच्या सवलतीचा लाभ घेत 121 ग्राहकांकडून 15 लाख 80 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. हे सर्व प्रकरण लोक अदालत च्या माध्यमातून सामोपाचरणे काढण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया भंडारा परिमंडलकडून लाखो ग्राहकांना वीज पुरविली जात आहे. मात्र अनेक असे ग्राहक आहेत की वेळेवर विद्युत बिल भरत नाही. त्यामुळे त्या ग्राहकांवर बिल वाढत जाते. एवढेच नव्हे तर अनेकांकडून वीज चोरीची प्रकरणे सुद्धा उघडकीस आली आहेत. गोंदिया-भंडारा परिमंडलमध्ये हजारो ग्राहकांवर लाखो रुपयांचे बिल असल्यामुळे नियमानुसार त्यांचे कनेक्शन खंडित करण्यात आले होते. अश्या ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून लोक अदालतच्या माध्यमातून समोपचाराने प्रकरणे निकाली काढण्याच्या मानस महावितरणने केला आहे. शनिवारला आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जिल्ह्यातील हजारो थकबाकीदारांना नोटीस देऊन राष्ट्रीय लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या होत्या.
लोक अदालत मध्ये अनेक ग्राहक उपस्थित झाले. या अदालतीमध्ये 121 प्रकरणांच्या सामोपचाराने निपटारा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 15 लाख 80 हजार रुपये थकीत बिल वसूल करण्यात आले. एवढेच नव्हे तर महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ पण दिल्या जात आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. लोक अदालत मध्ये निपटारा करण्यासाठी गोंदिया भंडारा परिमंडलचे मुख्य अभियंता बी.ए. वासनिक, अधीक्षक राजेश नाईक, सम्राट वाघमारे, कार्यकारी अभियंता शरद वानखेडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र जैन, सहायक विधी अधिकारी प्रशांत मडावी, कनिष्ठ विधी अधिकारी राहुल खंडारे, अभय मेश्राम व केशव बहेकार यांनी प्रयत्न केले.