पाण्याचा काटकसरीने वापर करा- CEO अनिल पाटील
जलजागृती सप्ताहाची जिल्हास्तरीय कार्यशाळा
गोंदिया, ता. 16 : पाणी हे जीवन आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. भुगर्भातील पाण्याचा मोठया प्रमाणात उपसा होतो. त्याचे दुरगामी परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावेच लागतील. पाण्याचा अपव्यय होणार नाही; याची दक्षता घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज (ता. 16) जलजागृती सप्ताहाची जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. त्याच्या उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जलपूजन करण्यात आले. दरम्यान जलसंवर्धनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना जल शपथ दिली.