शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास शाळांची मान्यता काढणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

राज्यात दहावीची परीक्षा सुरु आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे.बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधान परिषदेत केली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. या पुढे ज्या शाळेत पेपरफुटीचे प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत. 
यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आगोदर पोहोचावे. सकाळी 10.30 चा पेपर असल्यास 9:30 वाजता तर दुपारी तीन वाजता पेपर असल्यास दोन ला पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. 

परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण पसरू नये दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे देखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.

परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे पालन करावे

1. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल

2. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50 मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल

3. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल 

4. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही

Print Friendly, PDF & Email
Share