कोविड निर्बंधांतून मुक्तता मिळाल्याने होळीचा उत्साह…

देवरी 16: होळी सणाच्या निमित्याने वसंत ऋतूची चाहूल लागल्याने वातावरणात हळूहळू बदल दिसायला लागते. निसर्ग मुक्तपणे रंगाची उधळण करत असते. त्यामुळे होळी, धुलिवंदन व रंगपंचमीच्या सनानिमित्याने देखील रंगाची उधळण केली जाते. आता देशासह राज्यात कोरोनाचा विळखा शितील होत असतांना अनेक भागात कोविड निर्बंधांतून मुक्तता मिळत आहे. त्यामुळे मागील २ वर्ष होळीचा साधेपणाने साजरा झाला आहे.मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. होळी हा साजरा करण्याकरिता देवरी शहरात, रंग, पिचकारी, गुलाल व फॅन्सी वस्तूची अनेक दुकाने लावण्यात आली आहे. यात रंगउत्सवाचे एक मोठे दुकान श्री. गुरुनानक फॅन्सी रंग भंडार नावाने लावण्यात आले आहे. या ठिकाणी रंगोउत्सवाचे अनेक फॅन्सी साहित्य मिळत आहेत. शहरातील बाजारात मोठी रेलचेल वाढली आहे.
दिवाळी नंतर होळी सण मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. हा सण यावर्षी १७ मार्च २०२२ रोजी होळी पेटवून साजरी केली जाणार आहे. होलिका दहनानंतर दुसरा दिवस धुलिवंदन म्हणजे होळीचा पाडवा असतो. याच दिवसी होळी खेळली जाते. याच दिवसी रंगाची उधळण केलीय जाते.
होलिका दहन यावर्षी १७ मार्च रोजी रात्री ९ वाजून ६ मिनिटे ते १० वाजून १६ मिनिट या वेळेत पेटवली जाणार आहे. या निमित्य देशाच्या विविध राज्यात व भागात निरनिराळे गोड पदार्थ बनवले जातात. यात पुरणपोळी, गुज्जीया व थंडाई चा समावेश आहे.
अशा प्रकारे होळीचा सण यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.

Share