‘शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवणार; पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत होणार नाही’
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विज बिलाबाबत महत्वाची घोषणा केली. मागच्या कित्येक महिन्यापासून कृषीपंपाच्या विज बिल माफ करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येत होती. दरम्यान आज नितीन राऊत यांनी पुढील तीन महिेने कृषी पंपाची विज न तोडण्याचे आवाहन केले आहे. ते आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही. तसेच ज्यांचे विज बिले थकीत आहेत त्यांनी त्वरित दुरूस्ती करून घेण्याचेही ते म्हणाले. दरम्यान राऊत यांच्या या घोषणेने तुर्तास शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे.
मागच्या आठवड्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी विज बिलासंदर्भात राज्यव्यापी आंदोलन उभारले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव विज बिलाबाबत तालुका स्तरावर शिबीरांचे आयोजन करण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याचबरोबर दिवसा कृषीपंपाना पाणी देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी तज्ञ अधिकाऱ्यांची समितीही नेमली आहे.