निसर्गमित्र पुरस्काराने इंजि. घनश्याम निखाडे सन्मानित
साकोली : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थच्यावतीने इंजि. घनश्याम निखाडे यांना राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्काराने रमेशजी कुंभारे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी साकोली यांच्या हस्ते तहसील कार्यालय साकोली येथे सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी अनिता गावंडे नायब तहसीलदार साकोली, अनिलजी किरणापुरे पंचायत समिती सदस्य साकोली, डॉ. जितेंद्रजी ठाकूर शारीरिक निदेशक सडक-अर्जुनी, खेमराज राऊत प्राचार्य ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय साकोली प्रामुख्याने उपस्थित होते. इंजि. घनश्याम निखाडे यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पोलीस भरती पूर्व परीक्षार्थींना प्रश्नसंच वाटप, जन्मदिनी भेट वस्तू म्हनून वृक्ष देऊन साजरा करणे, स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण, प्रजासत्ताक दिनी गड किल्ल्यावर जाऊन तिथे स्वच्छता अभियान राबवने व वृक्षारोपण करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संतुलनासाठी अथक परिश्रम घेत आहे व पुढेही करत राहील त्याचबरोबर कार्याची दखल घेतल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर, महाराष्ट्र अध्यक्ष बादल बेले यांचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे आयोजक यशवंत उपरीकर उपाध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास नागपूर विभाग, अनिता खोटोले, प्रा. गुलाबराव चौधरी, वनिता बहेकार, प्रीती डोंगरवार, पूजा कपगते, जयश्री भानारकर, वंदना नंदेस्वर, उर्मिला निंबेकर, जया भुरे, वर्षा तरजुले, कल्पना सांगोडे, संगीता खूणे व इतर पदाधिकारीही यांनी केले.