गोंदिया जिल्ह्यातील 21071 विद्यार्थीची आजपासून दहावीची परीक्षा
गोंदिया 15: दोन वर्षानंतर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर आज, 15 मार्चपासून होणार्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 21071 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. शिक्षण विभाग परीक्षेसाठी सज्ज झाले असला तरी मागील वर्षभर आभासी पद्धतीने शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांही परीक्षेसाठी उत्सुक आहेत.
कोरोना महामारीमुळे शालेय, महाविद्यालयीन प्रत्यक्ष अध्ययन व अध्यापन प्रक्रिया ही आभासी पद्धतीने सुरु ठेवण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष शाळेत अध्ययन, अध्यापन सुरु झाले असले तरी हा काळ कमी अवधीचा ठरत आहे. भविष्याच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे महत्वाचे मानले जाते. मागील वर्षाप्रमाणे यंदाही दहावीच्या विद्यार्थ्यांचे बहुतांश शिक्षण हे आभासी पद्धतीनेच झाले. मात्र यंदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने मंगळवारपासून सुरू होणार्या दहावीच्या परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कमी आणि एकूण वेळेच्या बाबतीत विशेष सवलत दिली आहे. असे असले तरी जवळ-जवळ दोन वर्षांच्या अंतराने होणारी परीक्षा सकारात्मक विचार ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षेचा सर्व विद्यार्थी सामना करणार आहेत. जिल्ह्यात 100 परीक्षा केंद्र व 197 उपकेंद्रावरुन 21 हजार 71 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.