क्लासमेट्स इन्फोटेक आणि संगणक संस्थेचे थाटात उद्दघाटन

◾️ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षणाची नवी दिशा मिळणार

देवरी 14: आधुनिक युगात वावरत असतांना स्वतःला अद्यावत ठेवणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिक संगणक प्रशिक्षणाची जोड असणे काळाची गरज झालेली आहे. कोरोना काळात शाळा बंद झाल्या आणि खऱ्या आधुनिक शिक्षणाची गरज भासली. संगणक प्रशिक्षण आजच्या घडीला अत्यावश्यक झालेले असून रोजगारासाठी आणि नोकरीसाठी यांचे महत्व आहे.
याच उद्धेशाने देवरी तालुक्यातील लोहारा या गावात प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून क्लासमेट्स इन्फोटेक ची सुरुवात करण्यात आली असून सदर संगणक प्रशिक्षण संस्थेचे उदघाटन पुराडा जिप क्षेत्राचे माजी सदस्य दिपकसिंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुभाष दुबे ( सुरतोली माध्यमिक विद्यालय ), रोकडे ज्वेलर्सचे प्रमोद रोकडे , आदिवासी विकास महामंडळ सोसायटी चे अध्यक्ष राजू राऊत , पोलीस पाटील परिहार , राकेश पवार , प्रा. डॉ. सुजित टेटे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि फीत कापून करण्यात आली. संगणक प्रशिक्षणाची माहिती प्राचार्य सुभाष दुबे यांनी मांडली. ग्रामीण भाग आणि संगणक प्रशिक्षणाची गरज यावर दिपकसिंग पवार यांनी मार्गदर्शन केला.
यावेळी लोहारा , सुरतोली गावातील मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजित टेटे यांनी केले असून आभार प्रदर्शन क्लासमेट्स इन्फोटेक चे केंद्र संचालक रंजित टेटे यांनी मानला.

Print Friendly, PDF & Email
Share