देवरी नगराध्यक्ष पदासाठी भाजप चे संजू उईके यांचे नामांकन

देवरी 10: नगरपंचायत देवरीच्या निवडणूका नुकतेच संपन्न झाल्या भाजपने आपले 11 नगरसेवक निवडून आणून भाजपचा कमल फुलविला. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत अनुसूचित जमातीच्या सर्वसामान्य प्रवर्गाला गेली त्यामुळे भाजपचे 3 चेहरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत होती. त्यामध्ये संजू उईके , कौशल्य बाई कुंभरे आणि नूतन सयाम यांच्या नावाची चर्चा होती. आज गुरुवार (10फेब्रु ) अखेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे संजू उईके यांचे नामांकन अर्ज दाखल झाले.

संजू शेषलाल उईके यांचे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी कडून एक फॉर्म सूचक प्रभाग क्र. 4 चे नगर सेवक रितेश सुरेश अग्रवाल व अनुमोदक करीता संजय रतीराम दरवडे प्रभाग क्र. 11 चे नगर सेवक यांनी सही केली आहे.

दरम्यान, नामांकन अर्ज दाखल करते वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल येरणे, महामंत्री प्रवीण दहिकर, द भंडारा अर्बन बैंक चे माजी अध्यक्ष व वरिष्ठ नेता महेश जैन, ऍड. भूषण मस्करे आदी उपस्थित होते.

Share