देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी संजू उईके , कौशल्याबाई कुंभरे व नूतन सयाम यांची दावेदारी

देवरी २९: देवरी नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती(सर्वसाधारण) करीता राखीव असल्याने देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रभाग क्र.६ चे उमेदवार संजू शेषलाल उइके यांची देवरी नगरपंचायतीच्या तिसऱ्या अध्यक्ष पदी वर्णी लागणार? अशी देवरी शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

सविस्तर असे की, देवरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ११ जागा जिंकून भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढल्यानंतर देवरी येथील अध्यक्षपद अनुसूचित जमाती(सर्वसाधारण) करीता निघाली आहे. बहुमत प्राप्त करणाऱ्या भाजपाकडे अनुसूचित जमातीचे तीन उमेदवार आहेत. यात संजू उइके, कौशल्याबाई कुंभरे व नूतन सयाम यांचा समावेश आहे. एकीकडे संजू उइके हे दुसऱ्यांदा निवडून आलेले असून हे अत्यंत प्रामाणिक, मनमिळावू व पक्षाचे निष्ठावन्त कार्यकर्ता आहेत तर दुसरीकडे कौशल्याबाई कुंभरे ह्या यापूर्वी ग्रा.पं.मध्ये चार वेळा व नगरपंचायती मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांच्या कड़े भरपूर अनुभव आहे. तसेच त्यांनी मागील पंचवार्षिकमध्ये अध्यक्षपद भूषविले होते. तर तिसरीकडे नूतन सयाम ह्या पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांच्याकडे अनुभव कमी असल्याने यावेळी संजू उइके यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार? अशी देवरी शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share