देवरीत मागील सहा वर्षांपासून नालीची सफाईच नाही

◾️दुर्लक्षामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात

देवरी 31 भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरीक निरोगी राहण्यासाठी मागील सात वर्षांपासून गांव स्वच्छतेचा वारंवार संदेश दिला. महाराष्ट्र शासनाने सुद्धा अनेक वर्षांपासून निरोगी राहण्यासाठी गाव स्वच्छतेचा संदेश देत आहे. परंतू , देवरी नगरात दोन विभागाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील काही वर्षांआधी देवरी नगरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ चे विस्तार करुन चौपदीकरण करण्यात आले. या चौपदीकरण्यात अनेकांची निवासीत घरे आणि व्यावसायिक दुकाने तोडून दोन्ही बाजूंनी महामार्गाची सीमा म्हणून नाली तयार करुन त्यावर सिमेंटचे झाकण लावण्यात आले आहे. तेव्हा पासून सदर नाल्यांची सफाईच झाली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
त्यामुळे, सदर नालीमधून नको ती दुर्गंधी बाहेर निघणे सुरु झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी अनेक वेळा देवरी नगर पंचायतच्या संबंधित विभागास लेखी स्वरुपात पत्र देऊन सदर दुर्गंधीची बाब आणि या दुर्गंधीमुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम लक्षात आणून दिले. परंतू , त्यांचे म्हणणे आहे की, सदर राष्ट्रीय महामार्गावरील नाली देवरी नगर पंचायत हद्दीत असली ? तरी पण त्या नालीची देखरेख आणि सफाईचे संपूर्ण काम महामार्ग तयार करणाऱ्या कंत्राटदार खाजगी कंपनीकडे आहे, असे सांगून हात वर केले आहे.
सदर राष्ट्रीय महामार्ग आणि नाली बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार खाजगी कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क होऊ शकला नाही. परंतू , नक्कीच या नालीच्या दुर्गंधीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील निवासीत असलेल्या तथा आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे नाकारता येणार नाही.

Print Friendly, PDF & Email
Share