सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या पतीवर गोळीबार

गोंदिया 28: गोंदिया जिल्ह्यात सामाजिक कार्यात सदैव अग्रसर राहणार्या पुरोगामी विचारांच्या प्रखर वक्त्या प्रा.सविता भुरले(बेदरकर)यांचे पती सामाजिक कार्यकर्ते धनेंद्र भुरले यांच्यावर आज (दि.28)सायकांळी 5 वाजेच्या सुमारास रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील कटंगी मार्गावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.भुरले यांना जखमी अवस्थेत सिव्हील लाईन स्थित डॉ बहेकार यांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवीदास कठाडे यांना विचारणा करण्यात आली असता घटना घडलेली आहे,त्यांच्यावर गोळीबार कुणी केला कोण आरोपी याबाबत मात्र आमच्याकडे सविस्तर माहिती अद्याप नाही असे सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share